जाहिरात
आपला जिल्हाताज्या घडामोडी

‘शासन आपल्या दारी’साठी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोलीत

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. ८ जुलै)

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी दि. ८ जुलै २०२३ ला गडचिरोली येथे उपस्थित राहणार आहेत.गडचिरोली शहरालगतच्या कोटगल एमआयडीसीच्या क्रीडांगणावर कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यातील लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ, दाखल्यांचे वितरण केले जाणार आहे.

सर्वसामान्यांची कामे सुलभरित्या व स्थानिक पातळीवर होणे आवश्यक असते. हेच लक्षात घेऊन नागरिकांना विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जात आहे. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत सातारा, कन्नड -औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर), रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड – पुणे, जळगांव, नांदेड जिल्ह्यांचा दौरा केला आहे. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून गरूजूंना योजनांबरोबरच विविध दाखले देण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना शासनाच्या इतरही योजनांचा लाभ घेणे सोयीस्कर झाले आहे. यातून योजनांची लोकाभिमुखता, पारदर्शकता वाढली आहे.

गडचिरोली जिल्हयात आत्तापर्यंत झालेल्या “शासन आपल्या दारी” उपक्रमातून ६ लाख ९७ हजार नागरिकांना विविध योजनांचे लाभ तसेच दाखले दिले आहेत. राज्यात सर्वात जास्त लाभ गडचिरोली जिल्हयाने वितरीत केल्याची माहिती गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी दिली आहे. या जिल्हास्तरावरील कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने लाभार्थी सहभागी होणार आहेत. याठिकाणी मान्यवरांच्या हस्ते हजारो लाभार्थ्यांना योजनांचे लाभही वितरीत करण्यात येणार आहे.

नागरिकांना विविध शासकीय दाखले, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, वय व अधिवासाचे दाखले, नॉन क्रीमीलेअर, शेतकरी दाखला, कामगार कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, रेशन कार्ड दुरूस्ती, ग्रामपंचायतीमधील विविध दाखले, नागरिकांचे विविध अभिलेख, मतदार नोंदणी अथवा नांव दुरूस्ती अशा अनेक प्रकारच्या दाखल्यांची किंवा कागदपत्रांची गरज असते. यातील वेगवेगळया ३३ योजना, सेवांचा लाभ गडचिरोली जिल्हयात दिला जात आहे. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतून अशा योजना, सेवांसाठीच्या कागदपत्रांचीही एकाच छताखाली पूर्तता करून दिली जात आहे.

रहदारीसाठी सर्वसामान्य नागरिकांना खालील मार्ग राहणार बंद
¶¶¶
“शासन आपल्या दारी” साठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे गडचिरोली दौऱ्यावर येत असून दि, ०८ जुलै ला वाहतुकीसाठी कोटगल टी-पॉइंट ते कोर्ट टी-पॉइंट, एम. आय. डी. सी. मार्ग, शासकीय विश्रामगृह मार्ग चंद्रपुर रोड, मा. जिल्हाधिकारी कार्यालय मार्ग आणि कॉम्प्लेक्स रोड हे मार्ग दि, ०८ जुलै ला सकाळी ६ वा. ते सायंकाळी ६ वा. पर्यंत सर्वसामान्य नागरिकांच्या रहदारीसाठी बंद राहणार आहे. असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button