जाहिरात
आपला जिल्हा

व्हॉईस ऑफ मीडियाच्या शिर्डी शिखर अधिवेशनात गडचिरोली जिल्हाध्यक्ष व्येंकटेश दुडमवार यांचा सन्मान

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,४ सप्टेंबर)

शिर्डी साईंच्या पावन भूमीत नुकताच पार पडलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या विश्वव्यापी पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्यस्तरीय शिखर अधिवेशनात अतिदुर्गम, नक्षलग्रस्त, आदिवासी बहुल जिल्ह्यात केलेल्या उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल व्हाॅईस ऑफ मीडिया गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष व्येंकटेश दुडमवार यांना सेवाकार्य विशेष पुरस्कार सन्मान २०२४ ने गौरविण्यात आले.

शिर्डी साईंच्या पावन भूमीत ३१ ऑगस्ट १ सप्टेंबर या दोन दिवसीय राज्यस्तरीय शिखर अधिवेशनाद्वारे राज्य भरातील पत्रकारांसाठी दोन दिवसीय विशेष मेजवानी देत त्यांची प्रश्न पत्रकारीते पुढिल आव्हाने यावर विशेष मंथन करित यातुन निष्पन्न चर्चेतुन वेगवेगळे आठ ठराव मंजूर करून संघटनेद्वारे शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे निर्णयही घेण्यात आले. अशा व्यापक अधिवेशनात व्हॉईस ऑफ मीडिया गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष व्येंकटेश दुडमवार यांच्या सेवाकार्याची विशेष दखल घेऊन त्यांना व्हाॅईस ऑफ मीडियाचा सेवाकार्य विशेष पुरस्कार सन्मान २०२४ ने‌ गौरविण्यात आले.

व्हॉईस ऑफ मीडियाच्या शिर्डी शिखर अधिवेशनात महाराष्ट्रातील अनेक विविध संघटनांचे तालुकाध्यक्ष पदाधिकारी व अनेक पत्रकार उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button