बीड्री येथील अश्विनी बनली मुंबई येथे राज्य कर सहाय्यक अधिकारी
राष्ट्रीय मानवाधिकार संघटना (असो) ने केला अश्विनीचा जाहीर सत्कार

लोकशाही न्युज,एटापल्ली (दि,३१ ऑगस्ट)
हलाखीच्या परिस्थितीत एमपीएससी उत्तीर्ण करून मिळवली शासकीय नोकरी
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यापासून दूरवर वसलेल्या अतिशय घनदाट जंगलाने व्यापलेला अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त बिड्री या गावातील रहिवासी डोनाडकर कुटुंब या कुटुंबातील एक मुलगी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून मुंबई येथील माजगाव डाक येथे राज्य कर सहाय्यक या पदावर कार्य करणारी कुमारी अश्विनी अशोक डोनारकर हिचा शैक्षणिक प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे या गावात जायला धड रस्ता सुद्धा नाही, गावात जाताना चिखल माती आणि नाल्याने वाट काढत जावे लागते गावात ग्रामपंचायत सुद्धा नाही गावात बीएसएनएलचा कव्हरेज सुद्धा नाही.
गावात बसची सोय नाही गावात विद्युत पुरवठा आहे.पण ती न असल्यासारखीच आहे कारण लाईट गेल्यावर येईल कधी याची शाश्वती नाही गावात फक्त जिल्हा परिषद ची सातवीपर्यंत शाळा आहे पुढील शिक्षण अहेरी किंवा एटापल्ली तालुक्यात जाऊन आठ ते दहावी अथवा महाविद्यालयाचे शिक्षण घ्यावे लागते अनेक वेळा या खेड्यातून तालुक्याच्या ठिकाणी पैदल सुद्धा जाऊन शिक्षण घेतले.ऊन, वारा, पाऊस अशा अनेक संकटावर मात करीत गडचिरोली येथील समाज कल्याणचे वस्तीगृहात राहुन आपल्या उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणारी अश्विनी हिचे व तिच्या कुटुंबाचे कौतुक करावे तितके कमीच वस्तीगृहात राहून अनेकदा उपाशी- तापाशी राहून फक्त जिद्द आणि चिकाटीच्या भरोशावर उच्च शिक्षण घेऊन आकाशात उंच भरावी घेता येऊ शकते याची प्रचिती आज एटापल्ली तालुक्यातील बिड्री येथे गेल्यावर कळले.
राष्ट्रीय मानवाधिकार संघटना असो महाराष्ट्र प्रदेश चे प्रदेश अध्यक्ष प्रणय खुणे यांच्या नेतृत्वात व संकल्पनेतून आज बिड्री येथे येथील रहिवासी अशोक डोनाडकर यांची सुपुत्री कुमारी अश्विनी डोनाडकर यांच्या सत्कार निमित्त गेल्यानंतर आले अशोक डोनाडकर हे सर्वसाधारण गरीब कुटुंबिय मिस्त्री चे काम करून जेमतेम दोन एकर शेतीच्या भरोशावर कोणत्याही सोयी सुविधा नसतानाही फक्त जिद्द आणि चिकाटी च्या भरोशावर आपल्या मुलीला एमपीएससी चे शिक्षण पूर्ण करून वरिष्ठ अधिकारी पदावर पोहचवले खरोखरच हि बाब खूप अभिमानास्पद आहे की कुठल्याही सोयी सुविधा नसतानाही उच्च शिक्षण घेऊन उंच भरारी घेता येऊ शकते. बीड्री या गावातील ही मुलगी एमपीएससी चे शिक्षण पूर्ण करून मुंबईसारख्या ठिकाणी राज्य कर सहाय्यक या पदावर कार्य करीत आहे तसेच लहान मुलगी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत सुद्धा बीएससी चे शिक्षण घेत आहे आणि तिला सुद्धा भविष्यात शिक्षिका व्हायचे आहे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने कोठरी येथील भंते भगीरथ यांच्या उपस्थितीत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे, संघटनेचे प्रवक्ता ग्यानेंद्र विश्वास विदर्भ अध्यक्ष जावेद अली जिल्हा कार्याध्यक्ष रमेश अधिकारी ,भामरागड तालुका अध्यक्ष भीमराव वनकर ,सामाजिक कार्यकर्ते सुरेश दुर्गे, आसुटकर, युवा नेते हेमु नाकाडे , हर्षल वासेकर यांच्या उपस्थितीत एमपीएससी उत्तीर्ण करून मुंबई येथे राज्य कर सहाय्यक पदावर कार्य करणारी कुमारी अश्विनी हिचा बीड्री या गावात जाहीर सत्कार करण्यात आला.
कारण आजच्या डिजिटल काळात वाटचाल करणाऱ्या युवकांना युवतींना, शहरात सर्व सोयी सुविधा व सर्व विषयाचे ट्युशन क्लासेस उपलब्ध आहेत,तरीही उच्च शिक्षण घेऊन वरिष्ठ अधिकारी बनणे फार कठीण आहे परंतु घरात अठरा विश्व दारिद्र्य जीवन असताना सुद्धा तोकळ्या पैशांमध्ये काटकसर करून उच्च शिक्षण घेऊन वरिष्ठ अधिकारी बनणे हा प्रवास खरोखरच फार कठीण होता परंतु खेड्यात मिस्त्री काम करणाऱ्या अशोक डोनाडकर कुटुंबियाच्या या सुपुत्रीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या भरोशावर हे दाखवून दिले की ध्येयात जर एकाग्रता असेल आणि जीवनात जर प्रगती करायची असेल व संकल्प जर पक्का असेल तर जीवनात अशक्य असे काहीच नाही ? याची प्रचिती आज या छोट्याशा या बीड्री गावामध्ये आमच्या सर्वांना अश्विनीचे सत्कार करताना नक्कीच आले.
राष्ट्रीय मानवाधिकार संघटना (असो )चे वतीने असे उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबवण्यात येत आहेत जेणेकरून अशा सत्काराच्या माध्यमातून तमाम समाजातील इतर कुटुंबीयांना सुद्धा एक प्रोत्साहन मिळेल,राष्ट्रीय मानवाधिकार संघटने कडून या कुटुंबीयाला पुढील वाटचालीकरिता खूप खूप शुभेच्छा व प्रामुख्याने दुसरी मुलगी ती सुद्धा शिक्षिका बनण्यासाठी बीएससी चे शिक्षण अहेरी येथे घेत आहे तिला सुद्धा पुढील वाटचालीकरिता राष्ट्रीय मानवाधिकार (असो )जिल्हा गडचिरोली कुटुंबियाकडून खूप खूप शुभेच्छा दिल्या.
