जाहिरात
आपला जिल्हा

पुतणीवर बलात्कार करणाऱ्या मावस काकास २० वर्ष कारावास व १ लाख ७५ हजार दंड

Spread the love

लोकशाही न्युज गडचिरोली (दि,२९ ऑगस्ट)
संपादक : संदिप कांबळे

दसरा सणानिमित्य १५ वर्षीय पिडीत आपल्या मावशीकडे रा. भामरागड ता.जि. यांच्याकडे  गेली असता. मावशीच्या घरी आरोपी नाव दल्लू मडावी (मावस काका), वय २९ वर्ष याने दि,११ ऑक्टोम्बर २०१९ ला सकाळी ९ वाजता पीडित मुलगी ची मावशी शाळेत गेली असल्याची संधी साधून पलंगावर लेटवून तोंड बांधून बलात्कार केला घटनेची कुठे वाच्यता केली तर मारून टाकण्याची धमकी सुद्धा दिली होती.

घडलेली घटना पिडीतेनी आई- वडिल व मावशी हिला सांगीतले. पिडीतेच्या आई वडील यांना माहीती कळताच पिडीतेला घेऊन आरोपी यांचे विरुद्ध पोस्टे भामरागड येथे येवून वरीलप्रमाणे घडलेली घटनेची तोंडी रिपोर्ट दिल्यावरुन आरोपी विरुद्ध कलम ३७६ (३) ५०६ भादवी, अन्वये गुन्हा नोंद केला व दिनांक १२ ऑक्टोम्बर २०१९ रोजी आरोपी याला अटक करण्यात आली.

सदर घटनेची पोलीस यंत्रणेने सखोल तपास पूर्ण करून आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळून आल्याने मा. न्यायालयात दोषारोप दाखल केले असता से. के. क्र. ७५/२०१९ अन्वये मा. सत्र न्यायालयात खटला चालवुन दि, २८ ऑगस्ट २०२३ रोजी मा. अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. उत्तम एम. मुधोळकर सरकारी पक्षाचा युक्तीवाद व साक्षदारांचे बयान ग्राहय धरुन कलम ३७६ (३), ५०६ भादवी सह कलम ४ बाल. लै. अ. प्रति. कायदा अन्वये २० वर्ष सश्रम कारावास व १,७५,००० रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. व दंडाची रक्कम ही पिडीतेला पुर्नवसन व वैद्यकीय उपचाराकरीता देण्याचा आदेश करण्यात आला.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button