संतांचे विचार आत्मसात केल्यास समाजपरिवर्तन शक्य, प्रा.विजय गवळी
श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती कार्यक्रम

लोकशाही न्युज, गडचिरोली(दि,११ डिसेंम्बर)
भारत ही संतांची भूमी असून, प्रत्येक समाजामध्ये संत आहेत. त्या संतांचे विचार आत्मसात केल्यास समाजात परिवर्तन शक्य असल्याचे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) संत साहित्याचे अभ्यासक प्रा. विजय गवळी यांनी केले.
श्री संत संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव समितीतर्फे सर्वोदय वार्डातील श्री संताजी स्मृती प्रतिष्ठान रविवार १० डिसेंबर रोजी श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त भव्य शोभायात्रा, समाज प्रबोधन पर कार्यक्रम, व्याख्यान, वधु-वर परिचय मेळावा, प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ते संताजी महाराजांचे चरित्र समाजाची दिशा व दशा या विषयावर मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक तथा ‘संताजी एक योद्धा’ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक संजय येरणे तर प्रसिद्ध प्रबोधनकार तथा सप्त खंजिरी वादक वर्धाचे कीर्तनकार दिपक महाराज भांडेकर हे उपस्थित होते.
प्रा. विजय गवळी पुढे म्हणाले महाराष्ट्राला संत परंपरेचा मोठा इतिहास आहे संतांनी तत्कालीन आणि अनिष्ट रूढी, परंपरा व अंधश्रद्धेतून बाहेर काढून समाजात विज्ञानवादी दृष्टिकोन रुजवण्याचा फार मोठा प्रयत्न केला आहे असा अत्यंत विज्ञानवादी दृष्टिकोन समाजात रुजविणाऱ्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पोथ्या इंद्रायणी नदीत समाजकंटकानी
बुडवल्या संत तुकाराम महाराजांचे शिष्य संताजी जगनाडे महाराज यांनी गावोगावी फिरून संत तुकाराम महाराजांचे मुखोदगत अभंग पुनश्च लिहून काढले आणि समाजाला जागृत करण्याचे कार्य आयुष्यभर केले. परंतु, अजूनही समाज जुन्या रूढी, परंपरा व अंधश्रद्धेच्या जोखंडातून पूर्णतः मुक्त झालेला दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले एरणे यांनी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती कार्यक्रमामुळे त्यांच्या विचाराचा प्रवाह वाढत आहे आपल्या समाजातील संतांचे विचार पुढे यावे म्हणून समाजाचा लेखक म्हणून श्री संताजी महाराज यांच्या कार्यावर लेखन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला प्रभाकर वासेकर, प्रमोद पिपरे, सुरेश भांडेकर, भाग्यवान खोब्रागडे, संतोष खोब्रागडे, देवाजी सोनटक्के,राजेश इटनकर,विष्णू कांबळे, रमेश भुरसे, देवानंद कामडी,संदिप कांबळे,किशोर खोबरागडे,योगेश वंजारी,अतुल कांबळे, प्रफुल आंबोरकर,प्रकाश आंबोरकर, घनशाम लाकडे, राहुल भांडेकर आदींसह जिल्यातील विविध गावातून आलेले समाजबांधव, भगिनी, युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
