जाहिरात
गडचिरोली

आमदार डॉ देवराव होळी यांचा सुशिक्षित बेरोजगार संघटनेतर्फे निषेध

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२६ जुलै)

काल झालेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार डॉ देवराव होळी यांनी गडचिरोली जिल्ह्यात नक्षल म्हणून देण्यात येणारी रक्कम बंद करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे या मागणीच्या विरोधात सुशिक्षित बेरोजगार संघटना गडचिरोली तर्फे डॉ देवराव होळी यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आलेला आहे.

आमदार डॉ देवराव होळी यांनी ठेकेदाराकडून असंख्य अशी कोठयवधी रुपयाची वसुली केलेली आहे काही ठेकेदारांनी सदर वसुली देण्यास नाकार दिल्यामुळे डॉ देवराव होळी यांनी ठेकेदारांना धमकी देखील दिल्या होत्या. नगरपरिषद गडचिरोली येथे डॉ.देवराव होळी यांनी आपल्या अध्यक्षतेखाली आपल्या कार्यकर्ता सुरेश शहा यांच्या माध्यमातून गडचिरोली नगर परिषद मुख्यअधिकारी सिईओ यांच्या संगनमताने टेंडर मॅनेज करून ई निविदास स्पर्धा न करता सदर कामाचे दहा ते वीस टक्के रक्कम घेऊन होळी यांच्या माणूस सुरेश शहा यांनी काम विकलेली आहे.

 

(आमदार साहेब यालाच म्हणायचं का गडचिरोली चा विकास)

जिल्ह्यात गेल्या अनेक वषार्पासून रेल्वे, जिल्हा सामान्य रुग्णालयात एमआरआय मशीन, सिटीस्कॅन मशीन नाही आहे अनेक रुग्णांना एम आर आय काढण्याकरिता नागपूरला जावं लागतं एम आर आयच्या अभावामुळे अनेक रुग्णांना आपला जीव देखील गमवावा लागलेला आहे. डॉ होळींनी एम आर आय बद्दल अथवा आरोग्य शिक्षण व इतर समस्यांबद्दल न बोलता संबंधित वसुली करणारा मुद्दा पावसाळी अधिवेशनात प्रश्न मांडल्याबद्दल त्यांचे सुशिक्षित बेरोजगार संघटनेतर्फे जाहीर निषेध करण्यात आले आहे.

गडचिरोली जिल्हा हा भौगोलिक दृष्ट्या नक्षलग्रस्त व अतिदुर्गम जिल्हा आहे. या जिल्ह्यात विविध विकास काम करण्याकरिता अनेक कंत्राटदारांना आपले जीव गमवावे लागलेले आहेत अनेक ठेकेदारांना आपल्या कोट्यवधी रुपयांचे वाहन तसेच विकास कामाकरिता लागणारे साहित्य नक्षलवाद्यांनी जाळपोळ केल्यामुळे कोट्यावधी रुपयांची नुकसान झालेले आहे.

या जाहीर निषेध सभेला गडचिरोली शहरातील व जिल्यातील  अनेक सुशिक्षित बेरोजगार व कंत्राटदार  एकत्र आले होते व त्यांनी आमदार डॉ. देवराव होळी यांचा जाहीर निषेध नोंदवला .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button