जाहिरात
आपला जिल्हा

वनक्षेत्र सहाय्यक अधिकारी रमेश बानोत यांचेवर कारवाई करा

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार

Spread the love

लोकशाही न्युज,चामोर्शी (दि.२७ फेब्रुवारी)

तालुक्यातील मार्कंडा (कं.) वनपरिक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक रमेश बानोत सर्वसामान्य गोरगरीब जनतेला वनकायद्याचा धाक दाखवून लाठी काठीने मारहाण पैशाची मागणी करतात. अशा मुजोर वन क्षेत्र सहाय्यकाच्या त्रासाने विजयनगर, गांधीनगर, कालीनगर येथील नागरिक त्रस्त झाले असून, त्यांनी याची तक्रार राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांच्याकडे केली असून, सदर क्षेत्र सहाय्यकावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा कन्सोबा वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या विजयनगर, गांधीनगर, कालीनगर या गावातील नागरिकांनी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांच्याकडे या भागातील वन क्षेत्रसहाय्यक रमेश बानोत या वन अधिकाऱ्याची संपूर्ण कहानी ऑन द व्हिडिओ रेकॉर्डिंग सांगितली. गेल्या काही महिन्यापासून सदर वन अधिकारी या भागातील नागरिकांना वन कायद्याचा धाक दाखवून खूप त्रास देत आहे. या भागातील दोन-तीन नागरिकांना लाठी काठीने मारहाण सुद्धा केलेली आहे. तसेच अनेक नागरिकांकडून पैशाची मागणी केलेली आहे. वन क्षेत्र सहाय्यकाच्या त्रासापायी येथील महिलांनी सुद्धा व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवून वन क्षेत्र सहाय्यक बानोत यांना हटविण्याची मागणी केली.

यावेळी विजयनगर येथील अनेक नागरिकांनी एकत्रित येऊन शेकडोंच्या सहीनिशी वन क्षेत्र सहाय्यक बानोत यांना निलंबित करण्याची मागणी केली. सर्वात आधी या उर्मट आणि मुजोर वन क्षेत्र सहायकाची वनपरिक्षेत्रातून तत्काळ हकालपट्टी करण्याची मागणी केली. सदर वन अधिकारी मुख्यालयात न राहता चामोर्शी येथून ये-जा करीत आहे. तसेच याआधी सुद्धा या वन अधिकाऱ्याने विविध ठिकाणी अशा प्रकारे अनेक चुकीचे कार्य केलेले आहे. वनविभागाने तात्काळ या वनक्षेत्र सहायकास निलंबित न केल्यास मुख्य वनसंरक्षक, उप वन सरक्षक कार्यालयाच्या समोर गांधीनगर, विजयनगर, कालीनगर येथील नागरिकांना घेऊन विराट जन आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी दिला.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button