अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात, १५० किलो गांजा व २० लाख मुद्देमाल जप्त

लोकशाही न्युज, गडचिरोली / सिरोंचा (दि,२३ जुलै)
दि,२३ जुलै ला पोलीस स्टेशन असरअल्ली यांना छत्तीसगड राज्यातून चारचाकी वाहनाने अंमली पदार्थ (गांजा) असरअल्ली कडे येत असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने पोलीस स्टेशन असरअल्ली हद्दीतील असरअल्ली ते पातागुडम रोडवरील फॉरेस्ट नाक्याजवळ सापळा लावुन वाहनास थांबविण्याचा प्रयत्न केला असता, वाहन चालकाने वाहन न थांबविता वाहन हे रोडच्या खाली उतरवून वाहनातील एक महिला व एक पुरुष यांनी पळ काढला.
पोलीसांनी त्यांचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने एक महिला व एक परुष यांना पकडले. त्यानंतर त्या कारची तपासणी केली कारच्या मागील डिक्कीमध्ये ३६ लहान बॉक्स मिळून आल्याने त्या बॉक्समध्ये अंदाजे १५० किलो अमली पदार्थ (गांजा) अंदाजे किंमत १५ लाख रुपयर व गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन ( रेनॉल्ट डस्टर) क्र. एम एच ३४ ए एम ५५०१ अंदाजे किंमत ५ लाख रुपये असा एकूण अंदाजे किंमत २० वीस लाख रुपये चा मुद्देमाल मिळून आला.
मुद्देमाल पोलीस स्टेशन असरअल्ली येथे आणून आरोपी नामे १) शिव विलास नामदेव व २) ज्योती सत्येंद्र वर्मा, दोन्ही रा. उत्तरप्रदेश यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोस्टे असरअल्लीचे प्रभारी अधिकारी राजेश गावडे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अनुज तारे अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख तसेचउपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा सुहास शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन असरअल्लीचे प्रभारी अधिकारी राजेश गावडे यांचे नेतृत्वात जगन्नाथ कारभारी,दिलीप ऊईके, शंकर सलगर, आदिनाथ फड यांनी पार पाडली.
