जाहिरात
ताज्या घडामोडी

जिल्ह्यातील तलाठी व वनरक्षक पदभरतीला स्थगिती द्या,आमदार देवराव होळी यांची विधानसभेत मागणी

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि १८ जुलै)

गडचिरोली जिल्ह्यातील पेसा क्षेत्रांतील १७ तलाठी व वनरक्षक पदभरती करतांना ९ जून २०१४ च्या राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार भरण्याची जाहिरात प्रसिद्ध झाल्याने जिल्ह्यातील ओबीसी बांधवावर प्रचंड अन्याय झालेला आहे असून या पदभरतीला तात्काळ स्थगिती देऊन २८ फेब्रुवारी २०२३ च्या राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार पदभरतीची प्रक्रिया राबवून ओबीसी समाजावरील अन्याय दूर करावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवराव होळी यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन च्या माध्यमातून विधानसभेत केली.

 

(गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव होळी तलाठी व वनरक्षक भरती ची स्थगिती बाबत विधासभेत मागणी करतांना)

गडचिरोली जिल्ह्यात वर्ग ३ व ४ ची १७ संवर्गातील १५८ पदे भरताना १५१ पदे पेसा क्षेत्रातील असून त्यात ओबिसी समाजाला एकही जागा नाही.

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी ओबीसी वरील अन्याय दूर करीत या १७ संवर्गामध्ये पेसा क्षेत्राची लोकसंख्या निहाय वर्गवारी करून ओबीसी समाजालाही आरक्षण दिलेले आहे. त्यानुसार महामहिम राज्यपाल यांनी २८ फेब्रुवारी २०२३ च्या अधिसूचना काढलेली आहे. मात्र त्या अधिसूचनेचा विचार न करता २०१४ च्या अधिसूचनेनुसार पदभरती होत आहे. असे केल्यास या पदभरती मध्ये ओबीसी समाजावर प्रचंड अन्याय झालेला असून ओबीसी समाजाला एकही जागा देण्यात आलेली नाही त्यामुळे ह्या पदभरतीला तातडीने स्थगिती देण्यात यावी व २८ फेब्रुवारी २०२३ च्या राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार पदभरतीची प्रक्रिया राबवावी अशी मागणी आमदार डॉ देवराव  होळी यांनी  विधानसभेत केली.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button