जाहिरात
आपला जिल्हा

गडचिरोली :५ जुलै ला ० ते १८ वयोगटातील मुलांसाठी मोफत हृदय तपासणी शिबिर

शिबिराचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली, (दि.४ जुलै)

जिल्ह्यातील ० ते १८ वर्षांतील जन्मजात हृदयविकार तसेच इतर हृदयाशी संबंधित आजारांनी ग्रस्त बालकांसाठी रविवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे मोफत टु-डी-इको व हृदय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे असल्याची माहिती कॉम्प्लेक्स परिसरातील सर्किट हाऊस येथे आज (दि. ४ जुलै) ला झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शिवसेना पदाधिकारी यांनी दिली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा विभाग, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन, ज्युपिटर हॉस्पिटल आणि आरोग्यदूत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या विशेष उपक्रमाचा उद्देश दुर्गम व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील बालकांना वेळेत निदान, तज्ज्ञ उपचार आणि अत्याधुनिक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. या शिबिरात जुपिटर हॉस्पिटल ठाणे येथील प्रख्यात बाल हृदयरोग तज्ञ डॉक्टर आशुतोष सिंग उपस्थित बाल रुग्णांची तपासणी करणार आहेत.

या सामाजिक उपक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या असून, दुर्गम भागातील गरजू बालकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाचे त्यांनी स्वागत केले आहे. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायती, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी या शिबिराची माहिती प्रत्येक गावापर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त पात्र बालकांना या शिबिराचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

खालील लक्षणे असलेल्या बालकांनी तपासणी करून घ्यावी
!!
जन्मजात हृदयात छिद्र असणे.आईचे दूध पिताना किंवा खेळताना श्वास घेण्यास त्रास होणे.वारंवार दम लागणे.वजन अपेक्षेप्रमाणे न वाढणे,हात-पायांची नखे किंवा ओठ निळे पडणे.हृदयाशी संबंधित इतर कोणतीही लक्षणे जाणवणे.

शिबिरामध्ये सर्व बालकांची मोफत 2D Echo तपासणी करण्यात येणार असून तज्ज्ञ हृदयरोगतज्ज्ञांकडून आवश्यकतेनुसार पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.

शिबिराची माहिती
!!
दिनांक : रविवार, दि. ५ जुलै २०२६
वेळ : सकाळी ८.०० ते दुपारी ३.००
स्थळ : जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली
वयोगट : ० ते १८ वर्षे

या संदर्भातील माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे विदर्भ प्रमुख प्रवीण ला. बा. शर्मा, जिल्हा प्रमुख संदीप ठाकूर, संपर्क प्रमुख सत्यपाल कत्तरवारे, महिला आघाडी संपर्क प्रमुख डॉ. संगिता राऊत (अमरावती),निखिल धोडरे, प्रफुल कोसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button