
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,९ ऑगष्ट)
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आमदार डॉ. देवराव होळी व मित्र परिवाराच्या वतीने गडचिरोली येथे भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये मुलांमधून नागपूरच्या सौरभ अशोक तिवारी प्रथम तर मुलींमधून रिमा राजेश धोतरे नागपूर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
यावेळी मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना रोख रकमेसह शिल्ड व प्रमाणपत्र देऊन आमदार डॉ. देवराव होळी यांचे हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकाचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी बक्षीस वितरणाच्या प्रसंगी अभिनंदन केले.
आजच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये गडचिरोलीसह चंद्रपूर,नागपूर येथील मुला मुलींनी उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी मुलांमध्ये द्वितीय क्रमांक राजन यादव तृतीय गौरव खोडतकर, चौथे नागेश्वर रस्से, पाचवे लोमेश शेंडे तर राहुल हरीनखेडे यांनी सहावा क्रमांक पटकावला. तर मुलींमध्ये द्वितीय आरती भगत, तृतीय आचल कुडुकर, चौथे अंजली मडावी, पाचवी तेजस्विनी कांबळे, सहावी पायल मांदाडे यांनी क्रमांक पटकाविला. यावेळी लक्ष वेधून घेणाऱ्या सहभागी लहान मुलांना यावेळी प्रोत्साहन पर बक्षीसही देण्यात आले.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आपल्या मित्रपरिवाराचे व क्रीडा विभागाच्या अधिकारी व शिक्षकांचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी आभार मानले.
