जाहिरात
गडचिरोलीताज्या घडामोडीराजकीय

राष्ट्रपतीपदासाठी श्रीमती द्रोपदी मुर्मु या सर्वसामान्य आदिवासी महिलेची निवड केल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या अभिनंदनाचा ठराव

आ. डॉ . देवरावजी होळी यांच्या मार्गदर्शनात भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पाठविले अभिनंदन ठरावाचे पत्र

Spread the love

गडचिरोली (दि,७ जुलै)

भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी, भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी व केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांचे अभिनंदन करणारा ठराव

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. देवाजी तोफा, रायपूर ग्रामसभेचे अध्यक्ष सुभाष वळधा, प्रकाश नरोटे व गोटुल सेनेच्या वतीने देण्यात आले अभिनंदन ठरावाचे पत्र .

भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने देशाच्या सर्वोच्च असणाऱ्या राष्ट्रपतीपदासाठी जनजाती (आदिवासी) समाजातील सर्वसामान्य परिवारातील असणाऱ्या श्रीमती द्रोपदी मुर्मू यांची निवड केल्याने गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामसभांच्या वतीने भाजपाचे अभिनंदन करण्यात येत असून अभिनंदनचा ठराव व पत्र आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या मार्गदर्शनामध्ये भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी यांना पाठविण्यात आले.
याप्रसंगी जिल्ह्यातील ग्रामसभांचे मार्गदर्शक जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा ,रायपूर ग्रामसभेचे अध्यक्ष सुभाष वडधा,सचिव प्रकाश नरोटे गोटुल सेनेचे परमेश्वर गावडे ,तुळशीराम नैताम यांनी अभिनंदनाचे पत्र दिले .
देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना या ७५ वर्षाच्या काळामध्ये एकदाही आदिवासी समाजाच्या व्यक्तीला देशाच्या या सर्वोच्च पदावर बसता आले नाही. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने एका सर्वसामान्य आदिवासी परिवारातील असणाऱ्या श्रीमती द्रौपदी मूर्मु यांची राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी निवड करून आदिवासी समाजाला न्याय दिला आहे. यामुळे आदिवासी समाजाची मान उंचावली असून जगामध्ये आदिवासी समाजाचा गौरव वाढविला आहे. यासाठी संपूर्ण आदिवासी समाज भारतीय जनता पार्टीच्या या निर्णयाचे समर्थन करीत असून या निर्णयाबद्दल त्यांचे अभिनंदन करीत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामसभांनी भारतीय जनता पार्टीच्या या निर्णयाचे स्वागत केले असून आपल्या ग्रामसभांच्या मार्फतीने भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय मां.नरेंद्रजी मोदी, भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी व केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांचे अभिनंदन करणारा ठराव पारित केला व तो ठराव पत्राच्या माध्यमातून माननीय जे.पी.नड्डा यांना पाठविला आहे .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button