जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नेरी येथील भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न
प्रतिनिधी-प्रवीन वाघे(दि,२ ऑक्टोंबर)
लोक कल्याण शिक्षण मंडळ नेरी द्वारा संचालित जनता विद्यालय तथा क. महाविद्यालय नेरी येथील विद्यार्थ्यांना सर्व भौतिक सुविधा मिळाव्या तसेच त्यांचे आरोग्य चांगले रहावे या करिता लोक कल्याण शिक्षण मंडळ नेरी चे पदाधिकारी तथा संचालक मंडळ यांनी विद्यालयात सर्व सोयी सुविधायुक्त विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना स्वच्छता गृह बांधायचे ठरवले या बांधकामाचे भूमिपूजन 3 ऑक्टोबर ला संस्थेचे सचिव श्री. सुनीलराव नागदेवते यांच्या हस्ते तसेच स्व. दागोजी गणबाजी पिसे स्मृती प्रित्यर्थ मे. पिसे पेट्रोलियम चिमूर तर्फे सप्रेम भेट वाटर कूलर चे लोकार्पण श्रीमती अंजनाबाई दागोजी पिसे यांचे शुभहस्ते करण्यात आले.

सदर कार्यक्रमास श्रीमती अंजनाबाई दा. पिसे, लोक कल्याण शिक्षण मंडळ नेरीचे अध्यक्ष, श्री. विष्णुकांतजी दि. बिरेवार, उपाध्यक्ष, श्री. टिकारामजी पिसे, सचिव श्री. सुनीलराव नागदेवते, कोषाध्यक्ष श्री. केवळरामजी वाघे, सदस्य श्री. सुरेशराव दा. पिसे, सदस्य श्री. मनोहरराव पिसे,सौ. सुविद्या विष्णुकांत बिरेवार,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. रमेश बोलधने, मुख्याध्यापक श्री. एस. एन. येरने सर, जनता प्राथमिक चे मुख्याध्यापक श्री. भांडे सर, जनता विद्याभारती कॉन्व्हेंट च्या प्राचार्या सौ. घोनमोडे , पर्यवेक्षिका कु. बी.के. बमनोटे मॅडम, श्री. अशोकराव पंधरे जनता विद्या. तथा क. महाविद्यालय नेरी, जनता प्राथमिक विद्यालय नेरी, जनता विद्याभारती कॉन्व्हेंट नेरी चे शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.
