तरुणीला ब्लॅकमेलिंग करून अत्याचार करणाऱ्या पोलीस शिपायाला अटक

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२५ जून)
स्वतःच्या पत्नीशी घटस्फोट झाल्याचे सांगुन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लैगिक शोषण करत त्यानंतर व्हिडीओ व्हायरल करायची धमकी देत ब्लकमेलींग करत दागिने व सव्वा तीन लाखांची मागणी पोलीस शिपायाने केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अटक करण्यात आलेल्या पोलीस शिपायाचे नाव पदमाकर भगवान भोजने (वय ३८ वर्ष) आहे.
पदमाकर भोजने हा शिपाई पोलीस मुख्यालयात कार्यरत होता अशी माहिती आहे. दरम्यान तो विवाहित असतांनाही पीडीत तरुणीशी त्याने आपला घटस्फोट झाल्याचे सांगुन प्रेमसंबंध जुळविले. त्यानंतर तो तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान पिडीत युवतीने लग्नासाठी विचारले असता त्याने नकार दिला व त्यानंतर त्याने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लकमेलिंग सुरु केली व दिड लाखांचे दागिने व सव्वा तिन लाखांची मागणी पिडीतेकडे करु लागला. त्यामळे त्रस्त झालेल्या पिडीत तरुणीने गडचिरोली पोलीस स्टेशन गाठुन तक्रार नोदविली.
पिडीतीच्या तक्रारीवरून बलात्कार व अॅट्रासिटीनुसार पद्याकर भोजने विरुध्द गुन्हा दाखल करुन २३ जून रोजी अटक करण्यात आली. त्यास न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहे.
