जाहिरात
गडचिरोली

संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,८ डिसेंम्बर)

संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची ३९८ वी जयंती जिल्हाभरात ठीक ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.

👆👆
गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौक येथे संताजी जगनाडे महाराज प्रतिमेला पुष्पहार घालून साजरी करण्यात आली. जयंतीला उपस्थित देवानंद कामळी,राजेश इटनकर, डॉ.प्रशांत चलाख, डॉ. सचिन कमळी, विलास निंबोरकर, मुक्तेश्वर काटवे, सुरेश भांडेकर यांच्यासह संताजी सोशल मंडळ, महाराष्ट्र तेलीक महासंघ, विदर्भ तेली महासंघ, विदर्भ तेली समाज समिती इत्यादी संघटनेचे पदाधिकारी हजर होते.

👆👆
गडचिरोली शहरातील चनकाई नगर या वार्डामध्ये हनुमान मंदिरामध्ये आज सकाळी संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला सर्वप्रथम संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून माल्यार्पण करण्यात आली व संताजी जगनाडे महाराज की जय असे जयघोष देण्यात आले. संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या जयंती उत्सवाकरिता प्र,आंबोरकर, सागर सोनटक्के, आशिष सातपुते, निखिल चरडे , विजय कुनघाडकर, रूपेश नंदनवार हजर होते.

👆👆
गडचिरोली शहरातील इंदिरानगर वार्ड येथे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त श्री संत जगनाडे महाराज नगर परिषद प्राथमिक शाळा लांझेडा येथे प्रतिमा पूजन करुन जयंती साजरी करण्यात आली, यावेळी अनिल कुनघाडकर,पटले सर, सायाम सर, विक्की नैताम, निलेश सोमनकर, मंगेश वैरागडे, हर्षल गेडाम, रोशन नैताम, जितू चलाख, गणेश नैताम व लांझेडा येथिल नागरिक उपस्थित होते.


👆👆
मौजा गोविंदपुर येथे संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी, संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्य रॅली काढून साजरी करण्यात आली,यात गावातील अनेक मान्यवर व महिला प्रामुख्याने हजर होत्या.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button