मंडल यात्रेचे गडचिरोली येथे जंगी स्वागत

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,३ ऑगस्ट)
दि, २ ऑगस्ट रोजी नागपूर येथून काढलेल्या मंडल यात्रेचे गडचिरोली येथील ओबीसी तथा ओबीसी बांधवांच्या समस्या लक्षात घेऊन इतर समविचारी घटकातील मान्यवर मंडळींनी इंदिरा गांधी चौकातील विश्राम गृहात आलेल्या मंडल यात्रेत सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांचे गुलाब पुष्प देऊन जंगी स्वागत केले.
यानंतर मंडल यात्रेत सहभागी कार्यकर्ते श्री उमेश कोराम व श्री प्रशांत बेले यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिनांक ३० जुलै ते दिनांक ६ ऑगस्ट २०२३ पर्यंत जागो ओबीसी जागो, आधा नही पुरा करो- मंडल आयोग लागू करो, मंडल आयोग लागू करो, वरना खुर्ची खाली करो, जाती जनगणना करणा हो, तो ओबीसी भाईयोंको जागना होगा! असा संदेश देत जी आठ दिवसांची यात्रा काढण्यात आलेली आहे त्याविषयी चे महत्व विशद केले आणि आता पर्यंत त्यांनी ज्या ज्या भागातून यात्रा काढली त्या दरम्यान त्यांना आलेले कडू गोड अनुभव ते देखील आपल्या कथनातून विशद केले.
यावेळी मंडल यात्रेत सहभागी असलेले कार्यकर्ते श्री उमेश कोराम, श्री प्रशांत बेले, दीनानाथ वाघमारे, सुभाष उके, संजीव भुरे, स्वरूप चव्हाण यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष श्री देवानंद कामडी, डॉ नामदेव किरसान , विठ्ठलराव कोठारे, एम डी चलाख, रमेश चौधरी, रजनीकांत मोटघरे, यांनी देखील ओबीसी बांधवांच्या समस्या वर मार्गदर्शन करून मंडल यात्रेत सहभागी असलेल्यांचा संपूर्ण प्रवास सुखमय होवो व ही यात्रा ज्या उद्देशासाठी निघाली ते ध्येय पूर्ण होवोत या मंगलमय कामनेसह हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांना मुल चंद्रपूरच्या प्रवासासाठी निरोप देण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन सर्वोदय मंडळाचे जिल्हा सचिव श्री विलास निंबोरकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा श्री पुरुषोत्तम एन ठाकरे यांनी केले. यावेळी पुरुषोत्तम बी ठाकरे, अनिल नैताम, तुलाराम नैताम, अनुप कोहळे, अनिल कोठारे, बालू आंबोरकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
