गडचिरोली : वनविभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने रेती तस्करी जोरात
सुरज हजारे यांची कारवाईची मागणी

लोकशाही न्युज,गडचिरोली ( दि.९ डिसेंबर)
गडचिरोली मुख्यालयापासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावरील वनविभागातील गुरवळा बीटातील
वन नाल्यामधून अवैध रेती उत्खनन करून वाहतूक केली जाते.तरी सुद्धा या वनपरिक्षेत्रातील अधिकारी यावर कुठलीही कारवाई करतांना दिसत नाही.
गुरवळा येथील अवैध रेती उत्खनन गडचिरोली वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या संगनमताने राजरोसपणे सुरू आहे. रात्रीच्या वेळेस जेसीबीच्या साह्याने ट्रक, ट्रॅक्टरने वाहतूक होत आहे. त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक केली जात असतांना वनकायद्यांना तिलांजली दिली जात आहे.
अवैध रेती वाहतूक वर कारवाई वनविभागाच्या परिसरातून अवैध तस्करी होत असताना वनपरिक्षेत्र अधिकारी, वनरक्षक, वनपाल यांच्या मोठा आशीर्वाद असल्याचे दिसून येत आहे. सदर तक्रारीची तात्काळ दखल घेऊन वाळूची तस्करी करणाऱ्या अवैध कंत्राटदार व ज्यांच्या आशीर्वादाने तस्करी होत आहे अश्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरज हजारे यांनी आपल्या लेखी तक्रारीतून मुख्य वनसंरक्षक वनवृत्त प्रादेशिक गडचिरोली यांना केलेली आहे.
