जाहिरात
गडचिरोली

गडचिरोली वृत्तपत्र विक्रेता संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक उत्साहात पार

Spread the love

गडचिरोली (दि,१ ऑगष्ट)

१ ऑगस्ट २०२२ ला गडचिरोली वृत्तपत्र विक्रेता संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक प्रेस क्लब गडचिरोली येथे उत्साहात पार पडली. यावेळी संघटनेच्या एकूण २२ सदस्यांपैकी २१ सदस्य उपस्थित होते. प्रथम संघटनेची जुनी कार्यकारणी रद्द करण्यात येउन त्यानंतर नविन कार्यकारणीची निवडणूक प्रक्रियेद्वारे निवड करण्यात आली. अध्यक्ष म्हणून संघटनेचे विद्यमान कोषाध्यक्ष श्री. अनिल बाळेकरमकर यांची निवड करण्यात आली. सचिव म्हणून संघटनेचे विद्यमान सचिव लोमेश बांबोळे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष श्री. हेमंत अंडेलकर यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्ष- श्री. प्रशांत वाढई, सह-सचिव- श्री. मारोती बाळेकरमकर, कार्याध्यक्ष-श्री. धिरज पतरंगे, प्रसिद्धी प्रमुख- श्री. अंकुश बोबाटे यांची बिन विरोध निवड करण्यात आली. सह-कोषाध्यक्ष म्हणून श्री. जयंत अर्जूनकर यांची निवड करण्यात आली.
यावेळी संघटनेचे प्रथम अध्यक्ष श्री. राजेन्द्र गव्हारे, माझी उपाध्यक्ष श्री. संदीप आकरे, संजय आकरे, रवींद्र कांबळे, दिलीप टेकरे, देवेंद्र बारापात्रे, पुरूषोत्तम रोडे, भास्कर कावळे, प्रविण अर्जूनकर, शंकर नैताम, उमेश सोनटक्के, विक्की बढवाईक, किशोर सुर्यवंशी आदी संघटनेच्या सर्व सदस्यांनी नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button