जाहिरात
गडचिरोली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पॅरामेडिकल कॉलेज येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे दुरदृष्य प्रणालीद्वारे शुभारंभ

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२१ सप्टेंबर)

दि. २० सप्टेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभाग तसेच कौशल्य, विकास व उद्योजकता विभाग मंत्रालय, मुंबई याद्वारे मान्यता प्राप्त गडचिरोली पॅरामेडिकल कॉलेज, गडचिरोली येथे महाराष्ट्र शासन अंतर्गत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची दुरदृष्य प्रणाली द्वारे शुभारंभ कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील व्यावसायिक शिक्षणाचे महत्व ओळखून कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक फायदा राज्यातील युवक-युवतींना व्हावा, करिता १००० नामांकित महाविद्यालयामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करून महाविद्यालयीन युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचा मानस आहे.

उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ. गीता एस. हिंगे जिल्हाध्यक्ष, भाजपा महिला मोर्चा, गडचिरोली, डॉ. मिलिंद नरोटे जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा गडचिरोली,डॉ. अनंत कुंभारे धन्वंतरी हॉस्पिटल, डॉ. प्रशांत चलाख सचिव, आय. एम.ए., गडचिरोली, डॉ. पंकज सकिंलावर, डॉ. उमेश समर्थ, भंडारा पॅरा मेडिकल अकॅडेमी चे संचालक डॉ. अनिल कुर्वे तसेच यावेळी कॉलेजचे प्राचार्या डॉ. दीप्ती वैद्य, प्रा. नलीना मेश्राम, प्रा. धनश्री देवळीकर, प्रा. भूषण राऊत, प्रा. सायली भांडेकर, प्रा. रचना संतोशवार, प्रा. पल्लवी बोरकर, संजीवनी मेश्राम याप्रसंगी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या यशश्वितेसाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button