जाहिरात
गडचिरोलीताज्या घडामोडी

चित्रा वाघ उद्या गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर ,महिला मेळाव्याला राहणार हजर

Spread the love

गडचिरोली( दि,१३ नोव्हेंबर )

भाजपा महिला मोर्चाच्या नवनियुक्त प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पक्षाच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याकरिता व पक्ष बळकटीकरणासोबतच महिला सशक्तीकरणासाठी राज्यव्यापी दौऱ्याचे आयोजन केले आहे. या दौऱ्याचा एक भाग म्हणून त्या उद्या १४ नोव्हेंबरला गडचिरोली जिल्ह्यात महिला मेळाव्याकरिता येत आहेत .

भाजपा महिला गडचिरोली शहर व ग्रामीण यांच्या वतीने १४ नोव्हेंबरला सुमानंद सभागृह आरमोरी रोड, गडचिरोली सकाळी ११.०० वा. येथे भाजपा जिल्हा महिला कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये त्या गावगाड्यातील महिलांपर्यंत भाजपाचे विचार पोहचविण्याच्यादृष्टीने संबोधित करणार आहेत.स्त्री सक्षमीकरणा सोबतच या मेळाव्याला खासदार श्री. अशोक नेते,आमदार डॉ.देवराव होळी,आमदार कृष्णा गजबे, जिल्हाध्यक्ष किसन नागदेवते, माजी आमदार अमरीशराव आत्राम, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे,जिल्हाचे महामंत्री रविंद्र ओल्लालवार,प्रमोद पिपरे,प्रशांत वाघरे,गोविंद सारडा, प्रदेश सरचिटणीस संघटन एस.टि. मोर्चाचे प्रकाश गेडाम, प्रदेश संपर्क सदानंद जी कुथे, युवा मोर्चा अध्यक्ष चांगदेव फाये, एसटी मोर्चाचे संदीप कोरेत,ओबीसी मोर्चाचे सुनील पारधी, अल्पसंख्यांक आघाडीचे बबलुभाई हुसेनी आदींची उपस्थिती राहणार आहे.

या महिला मेळाव्याला भाजपा महिला वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपाचे प्रदेश सदस्या रेखा डोळस,योगीता भांडेकर,वर्षा शेडमाके, गीताा हिंगे,सुनिता ढोरे,शालुताई दंडवते, प्रीती शंभरकर,संगीता रेवतकर, सुनंदा करकाडे,मीना कोडाप, रहिम सिद्दिकी, दुर्गम, सोनाली पिपरे, रुकसाना पठाण,शमा अली,वच्छला मुंनघाटे, गीता कुळमेथे,संघमित्रा खोबरागडे, पल्लवी बारापात्रे यांनी केले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button