जि. प.उ.प्रा. शाळा आंबेटोला येथील शिक्षक शाळेच्या वेळात क्रिकेट च्या मैदानात करतो कॉमेंट्री
लोकशाही न्युज, गडचिरोली/आंबेटोला (दि,२१ फेब्रुवारी)
शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे आणि जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही पण,
गडचिरोली मुख्यालयापासून १२ किलोमिटर अंतरावर असलेल्या मौजा आंबेटोला या शाळेतील शिक्षक शाळेच्या वेळेमध्ये शाळा सोडून क्रिकेट मैदानावर आनंदघेत आणि क्रिकेटची कॉमेंट्री करीत असल्याबाबत ची तक्रार त्या गावातील ग्रामवासीयांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केली आहे.
८८ पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आंबेटोला येथे शिक्षक नुरखॉ पठाण यांची शिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. नुरखॉ पठाण यांचे कर्तव्य मुलांना शिकवणी देणे करीता असून ते आपल्या कर्तव्यात नेहमी कसुर करीत असतात.
(सदर शिक्षक शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्याचे सोडून क्रिकेटच्या मैदानात कॉमेंट्री करीत असताना)
सद्या मौजा आंबेशिवणी येथे क्रिकेट टुर्नामेंटचे सामने सुरु असून त्या क्रिकेटच्या सामन्यामध्ये शाळेतील मुलांना वाऱ्यावर सोडून क्रिकेट कॉमेंट्री करीत असताना सदर शिक्षक हा ग्रामवासियांच्या निदर्शनास आला आहे.गावकऱ्यांनी तिथे त्यांना बोलल्यानंतर तेथून शाळेमध्ये निघून आले. मुलांना शाळेमध्ये मोकळे सोडून त्यांना कुठल्याही प्रकारचे शिकवणी देत नाही. किंवा मुलांचे अभ्यासक्रम घेत नाही. नेहमी गावकऱ्यांसोबत मनमानी करून मुजोरीपणाची भाषा करीत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे .
