जाहिरात
चंद्रपूरसिंदेवाही

गोठयात शिरून बिबट्याने वासराला केले ठार.

गोठयात वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावे,अशी गावकऱ्यांकडून मागणी

Spread the love

उमेश गोलेपल्लीवार
लोकशाही न्यूज

सिंदेवाही वनपरीक्षेत्र अंतर्गत उपवनपरीक्षेत्र नवरगाव अंतर्गत येत असलेल्या रत्नापुर बीट आहे.सदर रत्नापुर गावासभोवताल कोणताही जंगल परीसर नसुन सर्वत्र शेत-शिवार परीसर आहे. तरीपण या परीसरातुन वार्ड क्र ५ असलेल्या शांताराम कारमेंगे रत्नापुर येथे पहाटेच्या सुमारास थेट गोठयात शिरून बिबट्याने गोरीवर हल्ला केला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सविस्तर वृत्त असे की, नवरगांव शहरापासून २ किमी अंतरावर असलेल्या रत्नापुर येथे शांताराम कारमेंगे यांचे वार्ड नं ५ येथे गोठा आहे.

शांताराम कारमेंगे हे शेतकारी असून यांच्याकडे स्वमालकीच्या गायी-गोरी आहेत.३/५/२०२२ एप्रिलच्या सायंकाळी नेहमीप्रमाणे कारमेंगे यांनी आपल्या गुरांना झोपण्याआधी गोठयात बांधले व झोपायला निघुन गेले. पहाटे अंदाजे ३ ते ४ वाजेच्या सुमारास बिबट्या ने गोरीवर हल्ला केला.आणि त्यामधे बिबट्याने ठार केले. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही . या आधी अनेकदा बिबट्याने थेट गावात शिरून कित्येकांच्या घरचे गायी, शेळया , बकराचा सुद्धा जीव घेतला आहे.घटनास्थळी वनक्षक जितेंद्र वैद्य रत्नापुर, यांनी दाखल होवुन पंचनामा केला. जंगल परीसर सोडुन गावात वन्यप्राण्यांचा वावर वाढत असल्याचे चित्र या घटनेने दिसून येते आहे.त्यामुळे मानव व जंगली प्राणी यांचा सघर्ष होवुन जिवित हाणी होवु शकते.तरी वनविभागाने बिबट्याचा योग्य बंदोबस्त करुन गावाला भयमुक्त करावे, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button