आरोग्य सेविकेला आत्महत्येस प्रवृत्त करणारा आरोग्य अधिकारी अखेर निलंबित
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १० डिसेंबर)
मुलचेरा येथील कंत्राटी आरोग्य सेविकेस मानसिक त्रास देऊन आत्महत्येचा प्रयत्न करण्यास प्रवृत्त केल्याच्या गंभीर आरोपांनंतर, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मुलचेरा येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद घनश्याम म्हशाखेत्री यांना तातडीने निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे.
डॉ. विनोद घनश्याम म्हशाखेत्री यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणाची सखोल विभागीय चौकशी करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील तरतुदीनुसार त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळात डॉ. विनोद घनश्याम म्हशाखेत्री यांचे मुख्यालय जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, गोंदिया येथे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी दिली आहे.
