गडचिरोली (दि.२१)
आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने आज दिंनाक २१/४/२०२२ रोज गुरवारला बाळकृष्ण सावसाकडे यांच्या नेतृत्वात गडचिरोली शहरामध्ये बहुसंख्य कार्यकर्ता यांच्यासह पेट्रोल,डीझेल,व घरगुती वापरासाठी लागणारा स्वयंपाक गॅसच्या किंमती दररोज वाढत आहेत सर्व सामान्य माणसाला महागाईचा सामना करावा लागत आहे प्रस्थापित सरकारने जनतेला खोटे आश्वासन देऊन सत्ता हस्तगत केली परंतु जनतेच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन विसरुन गेले प्रस्थापित सरकारला जाग आणण्या साठी आम आदमी पार्टीने भोंगा आंदोलन उभे केले.
गोर,गरीब जनतेला मोफत गॅस देऊन फसविले पहील्यांदा सबसिटी बंद केली नंतर सिलेंडरचे दर वाढवले आता मात्र महागाईचा महापूर आला गोडे तेलाच्या किमती वाढल्या,गहू, तांदूळ,साखर, दैनंदिन गरजेच्या वस्तू महाग, वीजदर वाढले,घराचा कर वाढला या महागाईच्या कचाट्यातून सूटका करण्यासाठी आम आदमी पार्टी ने आंदोलन छेडले आहे त्याला जनतेचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे .
या आंदोलनात जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण सावसाकडे, महामंत्री भास्कर इंगळे,सहसयोजक रुपेश सावसाकडे, कोषाध्यक्ष संजय जीवतोडे, ॲंड.हेमराज मेश्राम,हितेंद्र गेडाम, मिडीया प्रमुख नामदेव कोल्हे,किशोर आत्राम,एकनाथ गजबे, कल्पना गजबे, सावन सावसाकडे,रामचन्द्र सायलवार,गौतम गेडाम,समीता गेडाम,गनेश त्रिमूखे,सोनल नन्नावरे, चंद्रमनी रामटेके, कविता कुमरे, भैय्याजी महाजन, विष्णुदास कुमरे,प्रशिका पेटकर,शिल्पा पेटकर,वर्षा मेश्राम,सुकेशनी रामटेके आदी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
