जाहिरात
विशेष

२२ ऑक्टोंबर ला उमंग चित्रकला स्पर्धेचे आयोजन हजारो रुपयांचे आकर्षक बक्षीस

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि, २१ ऑक्टोंबर)
संपादक:संदिप कांबळे

उमंग आर्ट कल्चरल अँड फिजिकल सोसायटी तथा नवकीर्ती दुर्गा उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने उमंग चित्रकला स्पर्धेचे आयोजन रविवारी २२ ऑक्टोंबर रोजी सकाळी ९.३० ते ११.३० वाजेपर्यंत कात्रटवार कॉम्प्लेक्स चामोर्शी रोड गडचिरोली येथे करण्यात आले आहे.

उमंग चित्रकला स्पर्धेचे हे नववे वर्ष असून स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी दरवर्षी सहभागी होत असतात या वर्षी देखील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सदर चित्रकला स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आव्हान आयोजकांकडून करण्यात आलेले आहे. चित्रकला स्पर्धा ही निशुल्क असून चित्र काढण्याकरिता कागद देखील आयोजकांकडून देण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना फक्त आपले रंगाचे साहित्य घेऊन वेळेवर उपस्थित राहायचे आहे इयत्ता पाहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता चार गटात स्पर्धा होणार आहे तसेच खुल्या गटातून इतर सर्वत्र चित्रकार सहभागी होऊ शकतात अशी माहिती यावेळेस आयोजकांकडून देण्यात आली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button