जाहिरात
गडचिरोलीसामाजिक

अंंधश्रद्धेचा बाजार पाहता,अंंधश्रद्धा निर्मूलनासाठी गाव तेथे संघटना स्थापन करण्याची आवश्यकता, डॉ शिवनाथ कुंभारे.

Spread the love

गडचिरोली (दि,९ ऑगष्ट)
दिनांक ९ ऑगस्ट रोजी समीतीचे संस्थापक कार्याध्यक्ष श्री नरेंद्र दाभोळकर यांनी काही साथींना सोबत घेऊन पुणे येथे महा अंनिस ची स्थापना केली त्याला आज ३३ वर्ष पूर्ण झाले. त्याचा वर्धापनदिन आज गडचिरोली शाखेच्या वतीने उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष तथा भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास चे विश्वस्थ व महा अंनिस चे जेष्ठ सल्लागार डॉ शिवनाथ कुंभारे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महा अंनिस चे जेष्ठ सल्लागार तथा रिपाई चे राज्य उपाध्यक्ष श्री रोहिदास राऊत, अ.भा. अंनिसचे जिल्हा अध्यक्ष श्री मनोहरराव हेपट, मा पंडित पुडके महा अंनिस चे माजी जिल्हा उपाध्यक्ष, श्रीमती चंदा मंगर सहाय्यक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली, मा प्रा अनिल धामोडे जिल्हा प्रतिनिधी दै. देशोन्नती, श्री विलास निंबोरकर राज्य सहकार्यवाह वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प, प्राचार्य प्रकाश अर्जुनवार आंतरराष्ट्रीय गांधी विचार मंच, मा गोवर्धन चव्हाण साहेब जिल्हा संयोजक गांधी विचार मंच, मा बंडोपंत बोढेकर ग्रामगीताचार्य आदी उपस्थित होते.
आज कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व अंनिसच्या कार्यकर्त्यांनी मला महा अंनिसने काय दिले किंवा मी महा अंनिस मध्ये आल्यानंतर माझ्यात व्यक्तीगत बदल कसा झाला, महा अंनिसचा माझ्या कुटुंबाला कसा फायदा झाला याविषयी कमीत कमी वेळात छान प्रकारे मांडणी केली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले मा धामोडे सर यांनी महा अंनिस द्वारे राबविण्यात येणारे उपक्रम अतिशय स्तुत्य असून मी या कार्यासाठी जरी वेळ देऊ शकत नसलो तरी एक सामाजिक दायित्व म्हणून दैनिक देशोन्नती मध्ये येणाऱ्या बातम्यांना प्राधान्य देऊन ते जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी जास्तीत जास्त मदत करीत असतो व पुढेही करत राहीन असे आश्वस्त केले.

मा रोहिदास राऊत यांनी महा अंनिस चे कार्यकर्ते तन -मन- धन सर्वच पणाला लावून जिद्दीने काम करतात. डॉ दाभोळकरांनी लावलेल्या महा अंनिस रुपी रोपट्याचे रुपांतर महाराष्ट्रभर सर्वदूर पसरल्याने त्याचे विशाल अशा वटवृक्षात रुपांतर झाले आहे. अंंधश्रद्धा निर्मूलनाचे काम कधी संपेल हे सांगता येत नसले तरी त्याला एक ना एक दिवस खिळ बसेल अशी खात्री आहे. मात्र ते अव्याहत चालू ठेवावे लागेल. हे काम केवळ एकट्या दुकट्याचे नसून सर्वांना मिळून प्रयत्न करावा लागेल असे मौलिक मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना श्री कुंभारे साहेब म्हणाले की, कोणत्याही वर्तमानपत्रांचे पान उघडले की कुठे ना कुठे अंंधश्रद्धेचे प्रकरण घडलेले दिसते. आणि त्यात जास्तीत जास्त स्त्रीयांचाच बळी जात असतो. स्त्रीयांच्या गळ्यात आणि पुरुषांच्या हाताच्या दंडाला ताईत व रंगीबेरंगी धागे दोरे बांधलेले असतात. हे थांबविण्यासाठी गाव तिथे महा अंनिसच्या कार्यकर्ते निर्माण करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. माननीय चंदामंगर माननीय प्रकाश अर्जुन वर माननीय गोविंदा गोवर्धन चव्हाण माननीय पंडित बुडके श्री मनोरा हेपट आदींनी अंधश्रद्धेच्या उच्चाटनासाठी खूप काही करावे लागणार आहे व ते काम महा अनिश चे कार्यकर्ते जोमाने करीत आहेत असे मत व्यक्त केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे मान्यवरांनी भरभरून कौतुक केले.
सांस्कृतिक अभिव्यक्ती कार्यवाह श्री पुरुषोत्तम ठाकरे यांनी कार्यक्रमाची सुरुवात “आम्ही प्रकाश बीजे….” या गीताने केली तर सांगता “हम होंगे कामयाब…” आणि “या भारतात बंधू भाव नित्य वसू दे….” या सामुदायिकरित्या गीताने झाली. प्रास्ताविकपर मार्गदर्शन जिल्हा कार्याध्यक्ष श्री विठ्ठलराव कोठारे यांनी केले. सुत्रसंचलन बोदली शाखेच्या उपाध्यक्ष श्रीमती अर्चना राऊत यांनी तर आभारप्रदर्शन श्री विलास निंबोरकर यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रधान सचिव श्री विलास पारखी, शहर शाखा प्रधान सचिव श्री सुनील नन्नावरे, श्री उद्धव बांगरे, यांनी प्रयत्न केले. श्री गोविंदराव ब्राह्मणवाडे, उपेंद्र रोहनकर, दामोदर उप्परवार, पुरुषोत्तम चौधरी, प्रभाकर भागडकर, वामनराव भोयर, हरिदास कोटरंगे, सौ महानंदा निंबोरकर, कु. प्रियंका निंबोरकर, प्रशांत नैताम, सुधाकर दुधबावरे, केशव डाबरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button