आमदार डॉ देवरावजी होळी यांचे स्वीय सहाय्यक रमेश अधिकारी यांची गडचिरोली विधानसभा सोशल मीडिया संयोजक पदावरून हकालपट्टी

गडचिरोली (दि,४ सप्टेंबर)
पुढे रमेश अधिकारी यांचा गडचिरोली विधानसभा सोशल मीडिया अथवा माझ्या कोणत्याही कामाशी काहीही संबंध नाही.
पक्ष कार्यकर्त्यांनी व संबंधितांनी नोंद घ्यावी. आमदार डॉ देवरावजी होळी यांची माहिती
गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आपले खाजगी सहाय्यक श्री रमेश अधिकारी यास आपल्या कामावरून कमी केले असून त्यांची गडचिरोली विधानसभा सोशल मीडिया संयोजक पदावरून हकालपट्टी केली आहे. याबाबतची माहिती त्यांनी या प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
रमेश अधिकारी हे मागील काही वर्षापासून आमदार डॉ देवरावजी होळी यांच्याकडे त्यांचे खाजगी सहाय्यक म्हणून काम करीत होते. माञ आता त्यांना या कामावरून काढण्यात आले आहे. यापुढे आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या कोणत्याही कामाशी रमेश अधिकारींचा संबंध नसल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या सोशल मीडिया संयोजक पदावरूनही त्यांना हटविण्यात आले आहे.
