जाहिरात
ताज्या घडामोडी

गडचिरोली : शहरातील विविध प्रभागात विकासकामांचा नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोरकर यांच्या हस्ते शुभारंभ

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि. २७ फेब्रुवारी)

गडचिरोली शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकत नगराध्यक्षा ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांच्या हस्ते विविध प्रभागांमध्ये विकासकामांचा भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नगरपरिषद गडचिरोलीच्या वतीने उपाध्यक्ष निखिल चरडे आणि बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर आणि प्रभागातील नगरसेवक यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करून या महत्त्वपूर्ण कामांना अधिकृत सुरुवात करण्यात आली.

शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांची दुरुस्ती व मजबुतीकरण, सिमेंट काँक्रीट (सी.सी.) रोड बांधकाम, नाली बांधकाम तसेच इतर अत्यावश्यक मूलभूत सुविधांची उभारणी हाती घेण्यात आली आहे. पावसाळ्यात पाणी साचणे, खराब रस्त्यांमुळे होणारी गैरसोय आणि स्वच्छतेच्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने ही कामे अत्यंत महत्त्वाची मानली जात आहेत. या उपक्रमांमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुसूत्रता येणार असून सुरक्षित, स्वच्छ आणि सुकर वाहतूक व्यवस्था निर्माण होणार आहे.

कार्यक्रमाला प्रभागातील नगरसेवक, विविध समित्यांचे सभापती, पदाधिकारी तसेच संबंधित प्रभागांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button