आप नेते बाळकृष्ण सावसाकडे यांचे जन संवाद संपर्क अभियान जोरात

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,३ सप्टेंबर)
शासनातर्फे सामान्य व गरिबांना अनेक योजना सुरू केल्या मात्र तांत्रिक दोषामुळे त्या योजना पूर्णच होत नाही त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. त्या अनेक समस्यांचा पाठपुरावा करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आपचे जिल्हाध्यक्ष व आप नेते बाळकृष्ण सावसाकडे हे करीत आहेत.
गडचिरोली,चामोर्शी व धानोरा तालुक्यातील मागील बऱ्याच दिवसापासून सावरगाव, कारवाफा,गुरवळा, मारोडा अश्या गावात दिव्यांग मानधन नियमित न मिळणे,पी एम किसान योजनेचा लाभ न मिळणे, मातृत्व अनुदान एक वर्षा पासून प्रलंबित असणे,रोडच्या समस्या गंभीर आहे, जबरानज्योत जमिनीचे पट्टे न मिळणे,घरकुल योजनेचा शेवटचा हप्ता अजूनही मिळाला नाही, काही जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेष अजूनही मिळाले नाही,परिवहन महामंडळ च्या बसेस नियमित न येणे, श्रावणबाळ योजना मानधन थकीत असणे, लोडशेडिंग इत्यादी समस्या जाणून घेण्यात आले या समस्याचे निराकरण करण्यासाठी स्थानिक नागरिकांना घेऊन पाठपुरावा करू असे आश्वासन आपचे जिल्हा अध्यक्ष तथा नेते बाळकृष्ण सावसाकडे यांनी दिले.
यावेळी ओबीसी आघाडी अध्यक्ष संतोष कोटकर, सेवानिवृत्त शिक्षक आघाडी अध्यक्ष जाणिकराव ननावरे,जिल्हा महामंत्री शत्रुघ्नजी ननावरे,क्रिडा आघाडी अध्यक्ष हेमराज हस्ते,सेवानिवृत्त आघाडी अध्यक्ष दिवाकर साखरे, संघटनमंत्री हितेंद्र गेडाम, चामोर्शी तालुका अध्यक्ष खुशाल मरसकोल्हे ,युवा कार्यकर्ते संतोष कोडापे, अनिल फाफनवाडे,साहिल फाफनवाडे,शंकर चेनूरवार, जेष्ठ कार्यकर्ते तुळशीराम मोहूर्ले,संघटनमंत्री प्रेम धोबे,दिलीप येमडवार,गणेश येलेकर, उमेश भांडेकर, सय्यद अल्ली,तुलाराम लेनगुरे, मेघराज वासेकर, वासुदेव वरवाडे,विनोद अजबले, जितेंद्र पोटे,मोहन पिंपळशेंडे ,उत्तम कोवे,संतनू सिडाम,दिगंबर बावणे,अमन साखरे,अल्का ठाकरे,तानाजी ठाकरे,मुरलीधर मंगर,देवीदास उराडे,आनंदराव चलाख,यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
