नाल्यात वाहून गेला ट्रक ३ लोकांचे सापडले मृतदेह ३ लोक बेपत्ता
गडचिरोली ,भामरागड ( दि १० जुलै) :
गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने काही भागात पूरस्थिती निर्माण झाली असून काही मार्ग सुद्धा बंद आहेत. अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ५ ते ६ प्रवासी असणारा एक ट्रक काल ९ जुलै रोजी रात्रो अंदाजे ९:३० ते १० वाजताच्या सुमारास पेरमिली नाल्यावरून वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. आज रविवार १० जुलै रोजी सकाळी त्या ट्रक मध्ये ३ मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती असून स्थानिक SDRF व पथकामार्फत इतरांचा शोध सुरु आहे.
प्रशासनाने आधीच आलापली ते भामरागड १३० D रस्ता पूल वाहून गेल्याने बंद असल्याची माहिती दिली होती.
पण ट्रक चालकाच्या बेजबाबदार वृत्तीने सदर ट्रक नाल्यात वाहून गेला व त्यात ५ ते ६ लोक वाहून गेल्याची घटना घडली .
प्रशासनाला माहिती मिळताच तालुका व गावस्तरावरील यंत्रणा पाहटे पासून सदर घटनेबाबत शोधमोहिम राबवित आहेत.
