सायकल स्नेही मंडळ गडचिरोली तर्फे मातोश्री वृद्धाश्रम येथे वृक्षारोपण.
गडचिरोली (दि,२८ जुलै)
दर बुधवारला सायकल स्नेही मंडळाच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येते. या रॅलीचा उद्देश पर्यावरण वाचवा- पृथ्वी वाचवा आणि माणूस घडवा असा असून त्यासोबतच अंंधश्रद्धा निर्मूलन, व्यसन निर्मूलन , संविधान जनजागृती, जलप्रदूषण , ध्वनि प्रदूषण व वायू प्रदूषण आदिंवर नियंत्रण ठेवण्यासाठीच्या जनजागृतीचे कार्यक्रम राबविणे हे आहे. त्याचाच एक भाग म्हणून काल बुधवारला सायकल स्नेही मंडळाच्या वतीने गडचिरोली शहरातील चामोर्शी मार्गावरील मातोश्री वृद्धाश्रमाच्या आवारात वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. सायकल स्नेही मंडळाचे मुख्य प्रवर्तक ग्रामगिताचार्य श्री बंडोपंत बोढेकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मातोश्री वृद्धाश्रमाचे संचालक तथा सायकल स्नेही मंडळाचे सह प्रवर्तक श्री विलास निंबोरकर, कार्याध्यक्ष श्री विलास पारखी, सदस्य श्री उपेंद्र रोहनकर, प्रा. सौ सुनिता साळवे, वृद्धाश्रम कर्मचारी सौ भुरकाबाई रोहनकर आदी उपस्थित होते.
