जाहिरात
आपला जिल्हा

गडचिरोली येथे होणार वृत्तपत्र विक्रेत्यांचे राज्यस्तरीय अधिवेशन

अधिवेशनाच्या तयारी विषयी गडचिरोलीत बैठक

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२८ जुलै)

येत्या २६ व २७ जानेवारी २०२५ ला गडचिरोली येथे वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. त्याच संदर्भात आता पर्यंत झालेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी तसेच पुढील कामकजाची रुपरेषा ठरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार  यांनी नुकतीच गडचिरोली येथे भेट दिली. त्यावेळी त्यांचे सोबत राज्य संघटनेचे विभागीय संघटन सचिव विनोद पन्नासे (चंद्रपुर), राज्य कार्यकारणी सदस्य  चंद्रकांत घाटोळ (नांदेड) हे होते.

भेटी दरम्यान बालाजी पवार यांनी आता पर्यंत झालेल्या कामकाजाची माहिती घेतली आणि झालेल्या कामावर समाधान व्यक्त केले तसेच पुढील कामा संदर्भात मार्गदर्शन केले आणि काही सुचना केल्या. यावेळी त्यांनी नियोजित कार्यक्रमाच्या स्थळाची पाहणी सुद्धा केली व कार्यक्रम स्थळ खुपच सुंदर असल्याचे म्हणाले. तसेच विनोद पन्नासे , घाटोळ  यांनी सुद्धा अधिवेशनाच्या तयारी विषयी काही मार्गदर्शक सुचना केल्या.

गडचिरोली शहरात प्रथमच एखादे राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे. त्यामुळे हे अधिवेशन अधिकाधिक चांगले करण्याचा प्रयत्न करू असे गडचिरोली संघटनेने म्हटले आहे.
आजच्या बैठकी ला गडचिरोली संघटनेचे अध्यक्ष  अनिल बाळेकरमकर, सचिव लोमेश बांबाळे, कोषाध्यक्ष  प्रशांत वाढई, सह सचिव  मारोती बाळेकरमकर, प्रसिद्धी प्रमुख अंकुश बोबाटे, सदस्य  राजेन्द्र गव्हारे, संजय आकरे, रविंद्र कांबळे, संदिप आकरे, देवेंद्र बारापात्रे, आदि सदस्य उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button