चंद्रपूर
वाढोणा येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
उमेश गोलेपल्लीवार
तालुका प्रतिनिधी, सावली
तळोधी(बा.) वनपरिशेत्रातील वाढोणा येथील शेतकरी श्रीराम बनसोड वय ४३ हा शेतकरी आपल्या शेतावर पिकाला पाणी लावण्यात गेला असता. शेतामध्ये असलेल्या बसलेल्या बिबट्याने अचानक हमला करून जख्मी केले. त्यात किरकोळ जख्मी केले त्यानंतर जखमीला वाढोणा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर त्याला चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्याकरिता पाठविण्यात आले.
हमला करून शेतकऱ्याला जखमी केल्यानंतर बिबट्या घटना स्थळी असल्यामुळे लोकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. घटनास्थळी प्रभारी वनरक्षक एस.बी.पेंदाम व कुळमेथे वन रक्षक घटनास्थळी पोहोचले. पि.आर.टी. चे सदस्य व स्वाब नेचर केअर संस्था चे सदस्य यांनी बिबट्याला जंगलात हाकलून लावण्यासाठी फटाके फोडले.
जाहिरात
