जाहिरात
ताज्या घडामोडी

न्यायालयात काम करणारे कॉम्प्युटर ऑपरेटर वर्षभरापासून मानधनापासून वंचित

पत्रकार परिषदेतून केली न्यायाची मागणी

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि. १६ मे)

गडचिरोली जिल्हा मुख्यालय व तालुक्यातील न्यायालयात काम करणाऱ्या १२ कम्प्युटर ऑपरेटर हे मागील वर्षभरापासून मानधनापासून वंचित असल्याने त्यांनी न्याय मिळावा यासाठी दि. १६ मे रोजी प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेऊन आपबीती मांडली.

पत्रकार परिषदेला रजनी विलास किनेकर गडचिरोली, तेजराम कोठारे चामोर्शी, शिल्पा पुरुषोत्तम चिमणकर धानोरा, वृषाली झाडे देसाईगंज वडसा, कृतिका मनोज डोंगरे गडचिरोली, नीलिमा हरीश वाकडे गडचिरोली, रक्षा शेंडे गडचिरोली हे हजर होते.

विनसोल सोल्युशन प्रॉपर्टी लिमिटेड चिंचवड, पुणे या नामांकित कंपनीतर्फ मार्च २०२४ पासून गडचिरोली जिल्हा व तालुका मुख्यालय आस्थापनेवर १२ डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून १२ जणांची नियुक्ती करण्यात आली व त्यांनी आपले कामही सुरू केले. पण वर्ष उलटूनही अजूनही त्यांना मानधन मिळाले नाही.

कंपनीशी झालेल्या करार पत्रानुसार १३ हजार ५०० मासिक मानधन त्यांना अपेक्षित होते. कंपनीला वारंवार विचारणा केली असता १२ पैकी ८ जणांचे दोन महिन्याचे वेतन देण्यात आले उर्वरित ४ जणांचे अजून अजूनही मानधन मिळाले नसल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button