जाहिरात
आपला जिल्हा

गडचिरोली : बस आगारात नव्या कोऱ्या ४० बस दाखल

अ.भा. ग्रा.पं. च्या प्रयत्नांना यश

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.२ मार्च)

गडचिरोली आगारातील भंगार बसेस बंद करण्यात आल्या असून ४० नव्या बसेस आता रस्त्यावर धावू लागल्या आहेत. भंगार बसेस बंद करा अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत गडचिरोली जिल्हा ने डिसेंबर २०२४ ला केली होती.

विभागीय नियंत्रक रा.प.मं. गडचिरोली यांना भंगार अवस्थेत असलेले बसेस बंद करण्याबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने अनेक प्रवासी, ग्राहक यांच्या तक्रारी नंतर राज्य परिवहन महामंडळास निवेदन देण्यात आले होते.

गडचिरोली व सर्व तालुक्यातील प्रवासी ग्राहक तसेच शालेय मुला/मुलींच्या असुरक्षिततेबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. पण बहुतांश भंगार अवस्थेतील बसेस आहे. काही प्रवासी ग्राहकांचे जीव धोक्यात आणणारे प्रवास होत आहे. त्यामुळे नागरिकांचा व शाळेतील मुला/मुलींचा आरोग्य व सुरक्षेचा प्रश्न जैसे थेच असून हा गंभीर विषय झालेला आहे.याची दखल घेत भंगार बसेस बंद करण्याची मागणी होती.

आपल्या जिल्ह्यातील हजारो प्रवासी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व सुरक्षिततेच्या दृष्टीने एक छोटासा निर्णय म्हणून आपल्या आगारात नवीन बसेस करिता तात्काळ उपाय योजना करून हजारो प्रवासी ग्राहकासाठी ४० नव्या कोऱ्या बसेस सुरू करून गडचिरोलीच्या प्रवासी ग्राहकांची आनंदाने आता प्रवास सुखकर होईल त्यात मुळीच शंका नाही.

४० नव्या कोऱ्या बसेस गडचिरोली आगारात दाखल होऊन ते रस्त्यावर धावू लागल्यामुळे विभागीय नियंत्रक अशोक वाडीभस्मे यांचे अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे अध्यक्ष चंद्रकांत पतरंगे, सचिव उदय धकाते, संघटक विजय कोतपल्लीवार,अरुण पोगळे यांनी आभार मानले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button