जाहिरात
चामोर्शी

प्रल्हाद मंडलच्या अपघाताची चौकशी करा

गावकऱ्यांचे आमदार डॉ. देवराव होळी यांना निवेदन

Spread the love

लोकशाही न्युज, चामोर्शी (दि, ९ सप्टेंबर)

१८ ऑगस्ट २०२४ रोजी प्रल्हाद प्रदीप मंडल व उत्तम मंडल गडचिरोली वरून चामोर्शी कडे येत असताना तळोधी मोकासा जवळील वळणावर अपघात होऊन प्रल्हाद मंडल यांचा जागीच मृत्यू झाला परंतु घटनास्थळावरून मृतदेह न मिळता मृतदेह दुसरीकडे आढळून आला त्यामुळे सदर प्रकरण संशयास्पद असून प्रल्हाद मंडल यांचा घातपाताने खून करून अपघाताचा देखावा करण्यात आला आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची सविस्तर चौकशी करून न्याय मिळवून द्यावा व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मृतकाची आई पुष्पा प्रदीप मंडल व पत्नी प्रिया प्रल्हाद मंडल, व सर्व गावकऱ्यांनी यांनी निवेदनाच्या माध्यमातून आमदार डॉ देवराव होळी यांच्याकडे केली आहे.

या प्रकरणामध्ये प्रल्हाद प्रदीप मंडल व प्रणव उत्तम मंडल यांच्यात आर्थिक व्यवहारावरून मतभेद निर्माण झाले होते. त्यामुळे या घटनेपूर्वी त्यांच्यामध्ये नक्की काय झाले हे तपासण्याची आवश्यकता आहे सदर प्रकरणाची चौकशी चुकीच्या पद्धतीने करण्यात आली असून डॉग स्कॉड तसेच वापरण्यात आलेल्या यंत्रणेने देखील चुकीच्या पद्धतीने चौकशी केलेली आहे. त्यामूळे सदर प्रकरणाची चौकशी योग्य अधिकाऱ्यामार्फत झाल्यास हा अपघात नसून घातपात होता हे सिद्ध होईल.

आमदार डॉ देवराव होळी यांनी मंडल परिवाराचे सांत्वन करीत आपल्याला नक्कीच न्याय मिळेल असे आश्वासन दिले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button